नवाझुद्दिन सिद्दीकी आता बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत

मुंबई | अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीक लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 21 डिसेंबरला या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर येणार आहे. 

या सिनेमाची कथा शिवसेना खासदार संजय राऊत यांची आहे. नवाझुद्दिनच्या भूमिकेबद्दल विचारलं असता त्यांनी हसून 21 तारखेची वाट पाहा, असं सांगितलं.

दरम्यान, या सिनेमाच्या फर्स्ट लूक लाँच सोहळ्याला दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन हजेरी लावणार असल्याचं कळतंय. नवाझुद्दिनची मुख्य भूमिका असल्याने या सिनेमाच्या फर्स्ट लूकबाबत उत्सुकता चांगलीच ताणली गेलीय.