बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं- राज ठाकरे

मुंबई | नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दी .बा. पाटील असं नाव देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे.

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर ते सहारपर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव द्यावं असं मला वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार?. आता बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

मुळात नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं, असं राज ठाकरेंनी खडसावून सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

“सत्ता गेल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, पण कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार”

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More