Navi Mumbai | सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पनवेलमधील काही सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र सध्या ते पाणी ओसरलं आहे. मुंबई शहरात दिवसभर पावसाने नको नको केलं आहे. सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी दिली होती. तसेच रेल्वे रूळावर पाणी साचलं होतं. त्यामुळे अनेकजण चालत प्रवास करणं पसंद करत आहेत. मात्र अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. (Navi Mumbai)
अपघातात महिलेचे दोन्ही पाय गेले
नवी मुंबईतील (Navi Mumbai) सीबी़डी बेलापूर रेल्वेस्थानकावर चालत असताना एक महिला पाय घसरून खाली पडली. मात्र, पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. रेल्वेतील महिलांचा डबा त्या महिलेच्या अंगावरून गेला आणि यात महिलेचे दोन्ही पाय गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मोठी घबराट पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मुसळधार पावसाने चुनाभट्टी रेल्वेस्थानकावर पाणी साचल्याने मानखुर्द ते वडाळा येथील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हर्बर लाईनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्याच वेळी ही महिला सकाळी 10 वाजताच्या सुमारास बेलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर क्रमांक 3 वर ट्रेन पकडण्यासाठी गेली. (Navi Mumbai)
मात्र बेलापूर ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तिचा पाय घसरला आणि लोकलखाली पडली. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली आणि तिच्या अंगावरून गेली आणि तिचे दोन्ही पाय तुटले. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि काही वेळातच गाडी हटवून त्या महिलेने प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही. त्या महिलेवर एममजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरले आहे. (Navi Mumbai)
सध्या मुसळधार पावसाने हर्बर लाईन ठप्प झाली आहे. पनवेल ते वाशी मार्ग सुरू आहे. तर वाशी ते सीएसटीला येणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईला येण्यासाठी वाशी ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा लोकांचा प्रवास सुरू आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी अजूनही असल्याने सीएसटी ते वाशी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
News Title – Navi Mumbai Belapur Railway Station accident
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास
“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले
पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण
मुंबईत पावसाचं थैमान! ‘या’ भागांना बसला सर्वाधिक फटका, शाळा-महाविद्यालयातही पाणीच पाणी