महाराष्ट्र मुंबई

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”

मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याच्या मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रुजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचं काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत!

“शेतकरी आंदोलन केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावं, अन्यथा…”

कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या