नवी दिल्ली | दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राजा इतकाही संत निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात नवजोत सिंह सिद्धू यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर टीका केली होती. सिद्धू यांनी एप्रिल 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसोबतचे फोटो शेअर केले होते.
राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले, हेच कॅप्शन सिद्धूंनी तेव्हा दिलं होतं. आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धूंनी पुन्हा मोदींवर प्रहार केला आहे.
राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख लेI
Punjabi Translation :
ਰਾਜਾ ਐਨਾ ਵੀ ਫ਼ਕੀਰ ਨਾ ਚੁਣੋ ਕਿ ਕੋਈ ਵੀ ਵਪਾਰੀ ਉਸਨੂੰ ਆਪਣੀ ਜੇਬ ‘ਚ ਪਾਈ ਫਿਰੇ।— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 23, 2020
थोडक्यात बातम्या-
“राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार”
नरेंद्र मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा!
भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार!
तलाठी भरती प्रकरणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
ब्रिटनहून भारतात आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह!