बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवजोत सिंह सिंद्धूच्या अडचणी वाढल्या, बहिणीनेच केले ‘हे’ गंभीर आरोप

नवी दिल्ली | पंजाब काॅंग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू नेहमीच राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र आता ते कौटुंबिक कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. नवजोत सिद्धू यांच्या बहिणीने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अमेरिकेत राहणाऱ्या सुमन तूर यांनी नवजोत सिंग सिद्धू यांना क्रूर व्यक्ती असं म्हंटल आहे. त्या म्हणाल्या, 1986 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धूंनी आपल्या आईला सोडून दिलं आणि 1989 मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक बेघर महिला म्हणत त्यांचा मृत्यू झाला.

सुमन यांनी शुक्रवारी चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदमध्ये नवजोत सिंग सिध्दू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुमन तूर यांनी दावा केला आहे की, मी जे काही म्हणत आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत.

नवजोत सिद्धूने संपत्तीसाठी आईशी नातं तोडलं, पैशांसाठी आईला सोडलं. आम्हाला त्याच्याकडून पैसे नको आहेत, माझ्या वडिलांनी पेन्शन व्यतिरिक्त आणखी एक घर आणि जमिनीसह संपत्ती ठेवली होती, असंही सुमन यांनी म्हंटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, 20 जानेवारी रोजी सिद्धूला भेटायला गेल्या होत्या, मात्र त्यांनी मला भेटण्यास नकार दिला. त्यांनी फोन ब्लॉक केल्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे.

थोडक्यात बातम्या – 

लसीकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती; आता नाकावाटेही घेता येणार कोरोना लस

Pro Kabaddi Leauge: पुणेरी पलटणनं नोंदवला सलग तिसरा विजय

‘…सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं’; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल

मोठी बातमी! नितेश राणे न्यायालयासमोर शरण, म्हणाले…

भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More