मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला
पटियाला | काॅंग्रेस नेते आणि मुख्यमंत्रीपदाची आस धरुन बसलेले नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि पटीयालातील गायक दलेर मेहंदी (Daler Mehdi) सध्या गजाआड आहेत. या दोघांनाही एकाच बराकीत ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना कामे देखील दिली आहेत. सिद्धू तुरुंगात क्लार्कचे तर मेहंदी लेखनीस म्हणून काम करत आहेत. सिद्धू याला 1 वर्षाची तर मेहंदी याला 2 वर्षांची शिक्षा झाली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू याला 34 वर्षांपूर्वीच्या एका रोडरेज प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यावर त्याला पोलिसांना शरण जावे लागले होते. तर दलेर मेहंदी याला मानवी तस्करीच्या आरोपाखाली 18 वर्षापूर्वीच्या प्रकरणात पटीयाला न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यामुळे त्याची रवानगी पटीयाला तुरुंगात केली आहे. आता हे दोघे एकाच बराकीत आहेत.
पटीयाला तुरुंगात नवज्योत सिंग सिद्धूचा कैदी क्रमांक 241383 आहे आणि 10 क्रमांकाच्या बराकीत त्याला ठेवलेला आहे, अशी माहिती तुरुंग प्रशासनाकडून मिळते. सुरुवातीच्या दिवसांत सिद्धू तुरुंगातील जेवण जेवत नव्हता. त्याचे कारण त्याला गव्हाची अलर्जी आहे. त्यामुळे आता त्याला गव्हाच्या चपात्या न देता फक्त फळे, रोजमेरी चहा, अर्धा ग्लास रस आणि नारळ पाणी दिले जाते.
दरम्यान, या पटीयाला तुरुंगात सिद्धू आणि दलेर मेहंदीसोबत आणखीही उच्चभ्रु कैदी आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख बिक्रम सिंग माजीथिया, बळवंत सिंग राजोना, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी संजय पोपली आणि काँग्रेसचे माजी मंत्री साधू सिंग धरमसोट यांचा अधिकारी चामकूर सिंग आदी लोक गजाआड आहेत.
थोडक्यात बाचम्या –
भाजपच्या मध्यस्तीमुळे शिंदे-ठाकरेंची भेट होणार?, शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ
‘शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड त्यामुळे…’, स्नेह भोजनात आमदारांना सूचना
‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले
उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही
‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न
Comments are closed.