IPL मध्ये कॉमेंट्रीसाठी दिवसाला एवढे लाख मिळतात; नवज्योतसिंग सिद्धूंनी सांगितलं मानधन

Navjot Singh Sidhu | क्रिकेटपटू, राजकारणी आणि समालोचक अशा तीन खेळपट्ट्या गाजवणारे नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शैलीत दिसणार आहेत. पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची समालोचनात एन्ट्री झाल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. आपल्या अप्रतिम समालोचनाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना सामन्यात जिवंत ठेवण्याचे काम करतात. बऱ्याच दिवसांपासून समालोचन आणि टीव्ही शोपासून दूर असलेले सिद्धू प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतणार आहेत.

आगामी आयपीएल सामन्यांसाठी सिद्धू समालोचन करताना दिसणार आहेत. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. म्हणजेच ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) 2024 ते समालोचन करताना दिसणार आहेत.

सिद्धूंनी सांगितलं मानधन

आगामी आयपीएल हंगामातील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात 22 मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. खरं तर नवज्योतसिंग सिद्धू आगामी काळात स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना दिसणार आहेत.

दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सिद्धू जे आगामी आयपीएलसह दशकभरानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यास तयार आहेत, त्यांनी मंगळवारी एक मोठे विधान केले. ते त्यांच्या मानधनाबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये चांगली खेळी करून आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान सर्वच देशातील खेळाडूंसमोर असेल. लक्षणीय बाब म्हणजे सिद्धू म्हणाले की, एका स्पर्धेसाठी 60-70 लाख घेणारा मी आयपीएलमधील एका सामन्यासाठी 25 लाख रूपये घ्यायचो.

Navjot Singh Sidhu यांची एन्ट्री

2001 मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात सिद्धू यांनी समालोचनाच्या करिअरला सुरुवात केली होती. सिद्धू त्यांच्या विनोदी वन-लाइनर्ससाठी लगेचच प्रसिद्ध झाले. भारतातील क्रिकेट समालोचनातील त्यांच्या योगदानाने अमिट छाप सोडली आहे, ज्यामुळे ते खेळातील सर्वात संस्मरणीय आवाजांपैकी एक बनले.

नवज्योतसिंग सिद्धू यांची बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना भुरळ घालते. क्रिकेटच्या मैदानातून समालोचन क्षेत्राकडे वळणारे सिद्धू पुन्हा आयपीएलमध्ये समालोचन करणार म्हणजे चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. ते आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसणार नाहीत.

News Title- Navjot Singh Sidhu has an entry in Commentary and he used to charge 25 lakh rupees for one match in IPL
महत्त्वाच्या बातम्या –

आयकरातून भारत सरकारची बक्कळ कमाई; कर संकलनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!

महायुतीत मनसेची ‘जागा’ पक्की? राज ठाकरेंना मुंबईतील एक जागा मिळण्याची शक्यता!

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत