बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवज्योत सिंग सिद्धू 1000 गाड्यांच्या ताफ्यासह लखीमपूरला रवाना; युपीत तणावाचं वातावरण

लखनऊ | सध्या देशभर लखीमपूर येथील घटना चर्चेत आहे. देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याने सर्व देशात संतापाची लाट उसळली आहे. लखीमपूरला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून नेते जात आहेत. पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू 1000 गाड्या घेऊन लखीमपूला निघाले आहेत.

काॅंग्रेस पक्षातर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. देशभरातून विविध राज्यातील काॅंग्रेस नेते गाड्या घेऊन लखीमपूरला रवाना झाले आहेत. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे पंजाब काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे 1000 गाड्याचा ताफा घेऊन लखीमपूरला जात आहेत.

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण लखीमपूरमधून हालणार नाही, असं सिद्धू म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी आपण लखीमपूरला जात असल्याचंही सिद्धू यावेळी म्हणाले आहेत. लखीमपूरच्या घटनेवर काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी आपल्या शिष्टमंडळासह लखीमपूरला भेट देऊन आले आहेत.

दरम्यान, लखीमपूर घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराने  केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपवर या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. काॅंग्रेसशासित राज्यातील सरकारने ठिकठिकाणी भाजपच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना…’; शेलारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

“आता राष्ट्रवादीवाले बाॅलिवूडची पण भांडी घासायला लागलेत”

‘CCTV तपासा, एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’; पार्टीमधील ‘या’ व्यक्तीचा खळबळजनक आरोप

नुकसान भरपाईसाठी ठाकरे सरकारकडून मदत जाहीर; पुणे विभागाला मिळणार सर्वाधिक ‘इतक्या’ कोटींची मदत

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न; बच्चू कडूंवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More