बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

लखनऊ | देशातील वातावरण सध्या शेतकरी आंदोलनावरून प्रचंड तापलेलं पहायला मिळत आहे. देशभर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये जोरदार आंदोलन चालू आहेत. लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांच्या मृत्यूने देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू लखीमपूर येथे उपोषणाला बसले आहेत.

देशभर काॅंग्रेसतर्फे लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने गाडीखाली चिरडल्यानं 4 शेतकऱ्यांचा, 1 पत्रकाराचा आणि इतर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी आरोपीला अटक करेपर्यंत आपण या ठिकाणावरून हालणार नसल्याची भिष्मप्रतिज्ञा नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू पंजाबवरून 1000 गाड्यांचा ताफा घेऊन लखीमपूरला दाखल झाले आहेत. काॅंग्रेसचे मोठे मोठे नेते लखीमपूरला भेट देऊन आले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. आता सिद्धू यांनी थेट योगी सरकारलाच आव्हान दिलं आहे. परिणामी योगी सरकारची चिंता वाढली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची लखीमपूर घटनेवरून खूप नाचक्की होत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. काॅंग्रेस लखीमपूर प्रकरणात संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आक्रमक पवित्र्यानं आता योगी सरकार अडचणीत आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“नरेंद्र मोदींना वाटेल तेव्हा ते पाकिस्तानचं क्रिकेट बंद करू शकतात”

मुंबईचा सुर्या तळपला, हैदराबादच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं, 235 धावांचं लक्ष्य!

छोटा पॅकेट बडा धमाका, इशान किशनचा धुमधडाका, इतक्या चेंडूतच पठ्ठ्याने ठोकलं अर्धशतक!

मोदी सरकारला मोठा धक्का! मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांचा राजीनामा

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावर भाजपचा बहिष्कार; राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More