बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली | पंजाब काँग्रेसमधील राजकीय गोंधळ संपताना दिसत नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात बराच काळ वाद आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंच्या विरोधात उघडपणे वक्तव्य केलं होते की ते त्यांना कोणत्याही किंमतीला पंजाबचे मुख्यमंत्री बनू देणार नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावर पंजाब काँग्रेसला धक्यावर धक्के बसताना दिसत आहेत.

पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी मी तडजोड करू शकत नाही असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र नवज्योतसिंग सिद्धू यांचा पुढचा काय प्लॅन असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या- 

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More