चंदिगड | धार्मिक पुस्तकांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा नाहीतर राजीनामा देईन, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला आहे.
सिद्धू हा राजीनामा मंत्रिपदाचा देणार की पक्षाचा देणार याबाबत संदिग्धता आहे. त्यांनी भटिंडा येथे प्रचार सभेत बोलताना हे वक्तव्य केलं होतं.
बादल कुटुंबियांनी पंजाबला पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. धार्मिक पुस्तकांची विटंबना थांबली नाही आणि गुरुंचा आदर केला गेला नाही, तर मी राजीनामा देईन, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, 2015 मध्ये शिखांचा गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
महत्वाच्या बातम्या
-मोदींच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंनी काढला चिमटा, म्हणाले…
-कोणीही काहीही म्हणू देत, पण ‘फिर एक बार मोदी सरकार’च- उद्धव ठाकरे
-निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा
-“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”
-श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी
Comments are closed.