बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का! फर्जंद, फत्तेशिकस्तमधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या महामारीने अनेकांचा बळी घेतला आहे. कोरोनाने अनेक नेते, उद्योजक, अभिनेेत्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कालाकार नवनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

नवानाथ यांचा रूग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला. याबाबत  चित्रपट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्तमध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, असं दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नवनाथ हे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमिका साकारत होते. नवनाथ यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जेद चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद परिहार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण सध्या थांबवलं आहे. अनेक सेलिब्रिटी लोकांना कोरोनाच्या नियामंचे पालन करण्यास सांगत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

“टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा”

परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; क्रिकेट बुकिकडून ‘इतके’ कोटी रूपये उकळल्याचा आरोप

कोरोनाने वडील हिरावले; रात्री अंत्यसंस्कार करुन दुसऱ्या दिवशी पुण्यातील डाॅक्टर कर्तव्यावर रूजू

2011 च्या विश्वचषकात गंभीरचा 97 धावांवर बोल्ड काढणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More