Navnath Waghmare | जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी आंदोलन आणि उपोषण केलं होतं. मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण द्यावं. त्यांना ओबीसीतलं आरक्षण देऊ नये, अशी मागणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी केली. त्यांनी उपोषणही केलं. अशात नवनाथ वाघमारेंना (Navnath Waghmare) धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) आणि लक्ष्मण हाके यांनी दहा दिवस वडीगोद्री येथे सलग उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर दहा दिवसानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी मध्यस्ती केली आणि उपोषण मागे घेण्यास सांगितलं. उपोषणानंतर सगेसोयरेची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना दिले आहे.
तसेच नवनाथ वाघमारेंच्या (Navnath Waghmare) संरक्षणासाठी वडीगोद्री येथील ग्रामस्थांनी पोलिस संरक्षणाची विनवणी केली आहे. त्यावर नवनाथ वाघमारेंनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आपण स्वत:हून पोलीस संरक्षण मागणार नाही. जर पोलिसांना काळजी असेल तर ते संरक्षण देतील असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत.
धमक्यांचे फोन कॉल्स
आपल्याला झुंडशाही आणि जातीवादीय लोकांकडून अनेक धमक्यांचे फोन कॉल्स येत आहेत. मात्र मी धमक्यांना घाबरत नाही असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत. यामुळे आता वडीगोद्री ग्रामस्थांनी नवनाथ वाघमारेंना पोलीस सुरक्ष यंत्रणा द्यावी. तर आपण ते स्विकारू असं वाघमारे म्हणाले आहेत.
ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये मनोज जरांगे पाटील हे तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले असल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन करण्याचा अधिकार आहे. मात्र इथे कायद्याचा आवाज दाबण्याचं काम केल्याचं बोललं जात आहे.
“जरांगेंच्या मागे राजकीय षडयंत्र?”
कोणतंही आंदोलन हे कायदेशीर आणि रितसर व्हावं. लोकांना त्याचा कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. एका उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळं फासणं हे योग्य नाही. यावर गृह विभागाने लक्ष घालावं. जरांगे काय मागणी करतात हे लक्षात येत नाही. जे शक्य नाही अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या मागे पूर्णपणे राजकीय षडयंत्र आहे. ते कोणाचा प्रचार करत आहेत हे जनतेला माहिती असेलही, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
News Title – Navnath Waghmare Recived Danger Threating Call
महत्त्वाच्या बातम्या
‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज
“हनिमूनच्या रात्री नवऱ्याने मित्राबरोबर माझा लिलाव..”; करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा
निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video
“..तर कंगनाला राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं”; संजय राऊतांचा टोला