Top News देश

अनेक राजकारणी आणि क्रिकेटरसुद्धा ड्रग्ज घेतात- नवनीत राणा

नवी दिल्ली | सिनेसृष्टीच नाही, तर अनेक राजकारणी आणि क्रिकेटरही ड्रग्ज घेतात, असा धक्कादायक आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केला आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेल्या नवनीत राणा माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

फक्त बॉलिवूडला टार्गेट केलं जात आहे, मात्र या बॉलिवूड-टॉलिवूडने आमच्यासारख्या अनेक कलाकारांना नाव आणि प्रसिद्धी दिली आहे. आपण कोणत्याच क्षेत्राला संपूर्णपणे दोषी ठरवू शकत नाही. जे लोक ड्रग्जचं सेवन करतात, त्यांना तुम्ही बोला पण त्यासाठी संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करु नका, असं नवनीत राणा म्हणाल्या.

काही राजकीय नेत्यांची मुलेही ड्रग्ज घेतात. क्रिकेटचा तर ड्रग्जशी जुनाच संबंध आहे. एखाद्या क्रिकेटपटूने ड्रग्ज घेतल्याचं आपण अनेकदा ऐकतो, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, बॉलिवूडकडे देशातच नव्हे तर जगभरात आदराने पाहिले जाते. कुणीही तिच्यावर अशा प्रकारे टीका करु शकत नाही. यामुळे जागतिक पातळीवर बॉलिवूडची प्रतिमा मलीन होत असल्याचं नवनीत कौर राणा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पोलीस भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ‘इतकी हजार’ पदं भरणार!

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या