…तर ते लोक देशविरोधी; सचिनला ट्रोल करणाऱ्यांविरोधात नवनीत राणा भडकल्या!
नवी दिली | कृषी कायद्याविरोधात गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तिच्या ट्विटला प्रत्युत्तर देत देशाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ट्विट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरुन सचिनला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याच पार्श्वभूमिवर अमरावतीच्या खासदार नवणीत कौर राणा यांनी सचिनसह इतर सेलिब्रिटींच्या ट्विटचं समर्थन केलं आहे.
जर एखाद्या ट्विटवरुन सेलिब्रिटींना कोणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत, असं नवणीत कौर यांनी म्हटलं आहे. आज नवणीत कौर राणा संसदेच्या अधिवेशासाठी दिल्लीत आल्या होत्या. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
देशाचा अभिमान असलेले राष्ट्रीय नायक देशाच्या बाजूने आहेत की विरोधात, हे तर कुणीही सिद्ध करण्याची गरज नाही. या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही नवणीत कौर राणा म्हणाल्या.
दरम्यान, सचिनच्या ट्विटवर निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घातली होती. यावर भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच भूमिपूत्र, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान महाविकास आघाडी सहन करणार का?, असा सवालही फडणवीसांनी विचारला होता.
थोडक्यात बातम्या-
अबब… तब्बल 55 वर्षांपासून ‘या’ गावात एकाच घरातील माणूस होतोय सरपंच
अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!
जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; अरुण गवळीच्या कोरोना टेस्टचा निकालही आला!
…तर कोल्हापुरी हिसका दाखवू, ‘या’ भाजप नेत्याला स्वाभिमानीचा इशारा
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी
Comments are closed.