नवनीत राणांच्या अडचणीत वाढ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांच्या वडिलांना म्हणजेच हरभजन सिंह कुंडलेस यांना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर कुंडलेस यांनी मी फरारी नाही, असं म्हणत मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

कुंडलेस यांनी याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु मुंबई सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळं नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानं कुंडलेस यांच्यावरील फरारी घोषित करण्याची कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळं राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, हे जात पडताळणी प्रकरण असं आहे की, अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा निवडूण आल्या आहेत तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. पण नवनीत राणांनी नुसूचित असल्याचा दावा करत या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

परंतु त्यांनी दाखल केलेल्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रात आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरफार करून मिळाल्याचे समोर आले आहे. यानंतर नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-