बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

नवी दिल्ली | खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली. नवनीत राणा यांच्याबरोबर खासदार गिरीश बापट यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला. परंतु, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना नवनीत राणा यांनी आक्रमकपणे मांडलेली भूमिका पटली नसल्याने त्यांनी नवनीत राणा यांना धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे केला आहे.

नवनीत राणांनी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवर बोट ठेवत महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. लोकसभेत बोलताना त्या आक्रमक झाल्या होत्या. या सर्व प्रकरणानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावले असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

नवनीत राणा यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, सचिन वाझे प्रकरणात मी लोकसभेत ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि संसदेत महिला खासदार होण्याच्या नात्याने मी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. या सर्वांवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते ते मी पाहतो, तुलाही जेलमध्ये टाकू” अशा शब्दात धमकावले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या सर्व प्रकरणात चित्रा वाघ यांनी नवनीत राणा यांचं लेटरहेडवर असलेलं तक्रार पत्र आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करत नवनीत राणांवर कौतुकाचा वर्षावही केला. त्याबरोबरच, “आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही.” असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी अरविंद सावंत यांना ‘महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या धमक्या कसल्या देताय?’ असे प्रश्नही विचारले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More