मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Navneet Rana) यांनी ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली व न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अकरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी राणा दांपत्याला दिलासा दिला. राणा दांपत्याला सशर्त जामीन मंजूर झाला असून त्यांना पाच अटींचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राणा दांपत्याला प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना या मुद्द्याशी संबंधित कोणत्याही बाबींवर भाष्य करता येणार नाही. पोलिसांच्या तपासात अडथळे आणायचे नाहीत, कोणत्याही साक्षीदारावर दबाव आणायचा नाही व त्यांना प्रलोभने दाखवून प्रभाव टाकायचा नाही आणि अशा गुन्ह्यात पुन्हा सहभाही व्हायचे नाही, अशा पाच अटी न्यायालयाने राणा दांपत्याला घातल्या आहेत.
दरम्यान, प्रत्येकी 50 हजार रूपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचे हमीदार देण्याची अटही राणा दांपत्याला घालण्यात आली आहे. या अटींची पूर्तता केली तरच राणा दांपत्याची सुटका होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”
सर्वात मोठी बातमी! राणा दांपत्याला जामीन मंजूर
बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
मोठी बातमी! नवनीत राणांची प्रकृती खालावली, महत्त्वाची माहिती समोर
“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”
Comments are closed.