मोठी बातमी! जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार ‘या’ भाजप नेत्याची भेट
मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) चांगलेच अडचणीत सापडले. राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला दिलासा देत बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. राणा दांपत्याला न्यायालयाने पाच अटी घातल्या असून त्यांची आज कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. जेलमधून बाहेर येताच राणा दांपत्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची भेट घेणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आज तुरूंगातून परत येताच मी नवनीत राणा आणि रवी राणा यांना त्यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी भेटणार, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
दरम्यान, राणा दांपत्याला विशेष न्यायालयाने पाच अटींसह 50 हजार रूपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचे हमीदार देण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे या अटींचे पालन केले तरंच राणा दांपत्याची सुटका होणार आहे.
I will visit #NavneetRana & #RaviRana at their Khar Mumbai Residence today as soon as they come back from Jail
आज तुरुंगातून परत येताच मी नवनीत राणा आणि रवी राणा यांना त्यांच्या खार मुंबईतील निवासस्थानी भेटणार @BJP4India@Dev_Fadnavis@ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 5, 2022
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर
Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘जबरदस्तीने ओरल सेक्स करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्यावर एक्स वाईफचा गंभीर आरोप
दिलासा मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्यांच्या अडचणी कायम!
“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”
Comments are closed.