बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’; नवनीत राणांचं रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, अशी बोचरी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला. याला नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला समर्थन दिलं त्याचा मी आदर करते. पण रुपाली चाकणकरांनी मला सांगू नये कुणी राजीनामा द्यावा ते, असं म्हणत नवनीत राणा यांनी चाकणकरांना सुनावलं आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवरून लोकसभेतही शिवसेना-भाजप आमने सामने आले. तसेच या मुद्द्यावरून खासदार नवनीत राण यांनीही लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

थोडक्यात बातम्या- 

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘हा’ मित्रपक्ष ठरणार डोकेदुखी?

एक रात्र माझ्यासोबत घालव!; अंकिता लोखंडेचा निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती; वाझेंची आर्थिक गुपितं होणार उघड?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना मोठा झटका!

लेकीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् नंतर जाळून टाकलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More