Navneet Rana Banner | लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काहीच तास उरले आहेत. अनेकांचं लक्ष हे निकालाकडे लागलं आहे. अशातच आता अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा (Navneet Rana Banner) यांच्या विजयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. निकालाआधीच नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. (Navneet Rana Banner)
या बॅनरने आता साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे आता अनेक चर्चांनाही उधाण आलं आहे. दुसरीकडे किती हा आत्मविश्वास असंही बोललं जात आहे. हे बॅनर अमरावती जिल्ह्यातील राजकमक चौकात झळकले असल्याची माहिती समोर आली आहे. (Navneet Rana Banner)
निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर
अमरावती लोकसभा भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana Banner) या प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अशा आशयाचे बॅनर असून ते अमरावतीच्या राजकमक चौकात लावण्यात आले आहेत. आमदार रवी राणा आणि उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana Banner) यांच्या खासगी सचिव अवी काळे यांनी बॅनर लावले असल्याची माहिती समोर आली आहे.
बॅनरमध्ये हिंदू शेरणी असा उल्लेख
या बॅनरमध्ये नवनीत राणा यांचा हिंदू शेऱणी असा उल्लेख करण्यात आला. आमदार रवी राणा, नवनीत राणा, खाजगी सचिव अवि काळे यांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो दिसत आहेत.
तर आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा या जिंकून येणार असल्याचा दावा केला होता. तर अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनीत राणा यांचं काम केलं, असा खळबळजनक दावा नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या परिवाराचे मोदींसोबत जाणार असल्याचं एकमत झालं आहे. तसेच येणाऱ्या काही काळामध्ये शरद पवार देखील नरेंद्र मोदी यांच्यासोबत जातील असं राणा म्हणाल्या होत्या.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला उद्या लोकशाही भवनात सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे. यासाटी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. एकूण 108 मतमोजणी होईल. किमान एका फेरीला 30 ते 35 मिनिटांचा अवधी लागणार आहे.
News Title – Navneet Rana Banner At Amaravati Loksabha Election
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई हादरली! मंत्रालयासमोर IAS अधिकाऱ्याच्या लेकीने उडी मारुन संपवलं जीवन
“…तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल”; निकालापूर्वीच शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बारामतीत कोण मारणार बाजी?; मतमोजणीआधीच ‘या’ नेत्याचा मोठा दावा
“..मुळेच राज्यात महायुतीला फटका?”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
“अपघाताच्या रात्री दारु..”; अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली