“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान

Navneet Rana campaign against mahayuti

Navneet Rana | भाजप नेत्या नवनीत राणा या सध्या महायुतीचा भाग असून त्यांनी युतीविरुद्धच प्रचार सुरू केल्याने राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात जाहीर प्रचार केला आहे. दर्यापूरमधील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश बुंदीले यांच्यासाठी नवनीत राणा या प्रचार करत आहेत. (Navneet Rana)

दर्यापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याच जागेवर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी मिळवली आहे. रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत महायुतीलाच आव्हान दिलं आहे. याच रमेश बुंदीले यांच्यासाठी नवनीत राणा या प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. भाजपमध्ये असूनही त्यांनी महायुतीविरोधात प्रचार केल्याने अमरावतीत महायुतीमध्ये सगळं काही आलबेल तर आहे ना?, याबाबत बोललं जातंय. नवनीत राणा यांची नुकतीच एक सभा झाली. यात त्यांनी अडसूळ आणि ठाकरे गटाच्या उमेदवारावर जोरदार हल्ला चढवला.

“सर्वांनी मिळून माझा पराभव केला”

यावेळी नवनीत राणा यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाबाबतही मोठे आरोप केले आहेत. मी कुठल्याही वादळाला घाबरत नाही. मी हा मतदारसंघ दत्तक घेतला असून रमेश बुंदीले यांच्या पाठीशी उभे असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यानंतरही मी अजिबात खचले नाही, असंही नवनीत राणा(Navneet Rana) म्हणाल्या.

दर्यापूरमध्ये उद्धव ठाकरे गटाने गजानन लवटे यांना उमेदवारी दिली आहे. एक बँक लुटणारा आणि दुसरा दारू विकणारा आहे, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी गजानन लवटे आणि अभिजित अडसूळ यांच्यावर निशाणा साधला. आनंद अडसूळ व अभिजीत अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी मुंबईचे पार्सल, चार फुट्या आणि दीड फुट्या असा उल्लेखही केलाय.

नवनीत राणांचा महायुतीविरुद्धच प्रचार

तसेच, अडसूळ यांच्यावर 900 कोटींच्या बँक घोटाळ्यांचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे.या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारावरही निशाणा साधला. ठाकरेंनी जो उमेदवार दिला आहे, त्यांचा व्यवसाय दारू विक्रीचा आहे. त्या उमेदवाराला जर मते दिली तर पाईपलाईन लावून गावापर्यंत दारू विक्रीचे काम होईल, असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या आहेत.

महायुतीत असून भाजपचे बंडखोर तथा युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्यासाठी नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक भागात सभा घेऊन बुंदिले यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची दर्यापूरमध्ये सभा झाली. ज्यामध्ये शिंदेंनी महायुतीचा धर्म पाळावा, असा दम राणा दाम्पत्यांना दिला होता. असं असताना देखील राणा दाम्पत्याने महायुतीविरुद्ध भूमिका घेतली आहे. याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

News Title –  Navneet Rana campaign against mahayuti

महत्त्वाच्या बातम्या-

“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका

आज वैकुंठ चतुर्दशी, श्रीहरी व महादेवाची कृपादृष्टी कुणावर असणार?; वाचा राशीभविष्य

अभिषेकसोबत अफेरच्या चर्चांवर निम्रत कौर अखेर बोलली, व्हिडीओ तूफान व्हायरल

घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर समंथाचा मोठा खुलासा, म्हणाली…

‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .