बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाकडून नवनीत राणांना दिलासा, जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली |  खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडल्या आहेत. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना तुर्तास दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केला होता. अडसुळांच्या आरोपानंतर मुंबई हायकोर्टाने राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. नवनीत राणा यांचे वकील जेष्ठ विधिज्ञ ऍड. ढाकेपालकर आणि ऍड. गाडे यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायाधिशांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देत सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपानंतर राणा यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला केला आहे. जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्यासाठी आणि माझं खच्चीकरण करण्यासाठी हे एक राजकीय षडयंत्र आहे. परंतु याप्रकरणात अंतिम विजय हा सत्याचाच होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही-धनंजय मुंडे

दिल्लीत नेमकं शिजतयं तरी काय? ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीआधी चर्चेला उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More