Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी बुधवारी हैदराबादला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी थेट ओवैसी बंधूंना आव्हान दिलं आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये राणा ‘15 सेकंदांसाठी पोलीस हटवा. मग मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गायब झाले’, असं म्हणताना दिसून येत आहे. त्याचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. यामुळे नव्याने वाद ओढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
“एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यातला धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही 15 मिनिटं मागता. पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही काय ते सांगतो. ओवैसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गायब झाले हे कळणारही नाही.”, असं नवनीत राणा (Navneet Rana ) म्हणाल्या आहेत.
15 सेकंद लगेगा @AkbarOwaisi_MIM @asadowaisi pic.twitter.com/TfEmWhvArX
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) May 8, 2024
नवनीत राणा यांनी हैद्राबाद शहरामधील चम्प्पापेठ येथील उमेदवार श्रीमती माधवी लता यांच्या प्रचारासाठी युवा मेळावा घेतला. त्याठिकाणी युवकांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना हैदराबादमध्ये त्यांनी ओवैसींना हे आव्हान केलं आहे.
MIM कडून राणांवर कारवाईची मागणी
मात्र, राणा यांच्या वक्तव्यामुळे आता एमआयएमने थेट भाजपााला लक्ष्य केलं आहे. यासोबतच निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही केली आहे. एमआयएमच्या नेत्याने यावर संताप व्यक्त केला आहे.MIM चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी याला प्रत्युत्तर दिलं.
“भाजप नेते निवडणुकीदरम्यान अशी विधाने करत आहेत, जे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करतात. नवनीत राणा (Navneet Rana ) यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. कारण अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते.”, असं वारिस पठाण म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत.
News Title – Navneet Rana challenge to owaisi brothers
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा
“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”
नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?
शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा