बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी उद्धव ठाकरेंन आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर…”

मुंबई | खासदार नवनीत राणा लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. यानंतर रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला 13-14 दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी 14 दिवस नाही, तर 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार असल्याचंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कृष्णप्रकाश यांच्या अडचणीत वाढ?; दुसऱ्या लेटरबॉम्बने पोलीस दलात खळबळ

IPL पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, एका खेळाडूमुळे ‘ही’ संपूर्ण टीमच आयसोलेशनमध्ये

राणा दांपत्याला दिलेल्या वागणुकीवरून फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची तोफ कडाडली, म्हणाल्या…

संजय राऊतांचा ‘चवन्नीछाप’ असा उल्लेख करत रवी राणांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More