बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thakeray) दोन सभा घेत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे. राज ठाकरेंनंतर आता भाजप (BJP) देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद सातत्यानं वाढला आहे. नवनीत राणांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार  टीका केली आहे.

नवनीत राणा यांच्या खारघरमधील घरासमोर शिवसैनिकांना तोबा गर्दी केली आहे. त्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाहीत पण काल मातोश्रीबाहेर शिवसैनिकांना भेटले, अशी टीका राणा यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणा यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. सत्तेचा दुरूपयोग करण्यात येत आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.

दरम्यान, कलानगर भागात ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक या भागात जमले आहेत. शिवसैनिकांना आक्रमकपणा बघता पोलीस सतर्क आहेत.

थोडक्यात बातम्या –

“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी”; नवनीत राणांची जहरी टीका

राज्याच्या राजकारणात खळबळ! शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

“शिवसेनेनं बेईमानी केली नसती तर…”; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कोरोना पुन्हा वाढतोय! देशातील ‘या’ राज्यात मास्कसक्ती पुन्हा लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More