Navneet Rana l विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं आहे. तसेच दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम देखील माझ्या नणंद बाईने केलं आहे असं म्हणत यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
माझ्या नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, माझ्या नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. मात्र बाकी हे कार्यकर्ते सतरंजी उचलतात. त्यामुळे माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मत घेतले आहेत.
याशिवाय मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा हे काम नणंद बाई करत आहे. त्यामुळे त्यांनी एकही रोजगार उपलब्ध दिला नाही. तसेच आता नणंद बाईने खूप कमावले आहे. याशिवाय तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारच घर देखील लुटलं असल्याचा आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे.
Navneet Rana l राहुल गांधीचे खटाखट पैसा आला का? :
याशिवाय तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या तेव्हा स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी केला आहे. तसेच आमचे सरकार गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. तसेच स्वतःचं घर भरण्यासाठी तुम्ही तिजोऱ्या फोडल्या आहेत. याशिवाय आम्ही गोरगरीब लोकांना मदत करायला तिजोरी खाली केली आहेत.
याशिवाय राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात त्यांना विचारा व संविधानामध्ये देखील किती पान आहेत? असा सवालही राणा यांनी केला.
News Title – Navneet Rana On Yashomati Thakur
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार ‘महाराष्ट्र’ तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी मतदारांना शिवीगाळ केली…; भाजपचा हल्लाबोल
भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ
लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ
सोनं आज स्वस्त झालं की महागलं?, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर