‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’, नवनीत राणा कडाडल्या
मुंबई। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नंतर राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलच तापलं आहे. सध्या 40 पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत असून ही संख्या आणखी वाढेल, असा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत आहे.
राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलं असून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात एकनाथ शिंदेंची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींवरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
नवनीत राणा यांनी त्यांच्या मुंबई ते दिल्ली विमानप्रवासातील हनुमान चालिसा पठण करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई ते दिल्ली प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालिसा. उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू, असं खोचक ट्विट नवनीत राणांनी केलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत सुरत येथे होते. मात्र, या सर्वांना मध्यरात्री आसाममधील गुवाहाटी येथे एअरलिफ्ट करण्यात आलं. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असून सर्वांचं लक्ष आता शिंदेंच्या निर्णयाकडे लागलं आहे.
मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु pic.twitter.com/AmqbxNkm4V
— Navneet Ravi Rana (@navneetravirana) June 21, 2022
थोडक्यात बातम्या-
आदित्य ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण, नाना पटोलेंनी दिली माहिती
“आमची नेतृत्वावर नव्हे तर राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी”
एकनाथ शिंदे संतापले; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ
Comments are closed.