Top News अमरावती आरोग्य कोरोना

तब्येत बिघडल्याने खा.नवनीत राणांना नागपूरच्या रूग्णालयात तत्काळ हलवलं!

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदर त्यांच्यावर अमरावतीमध्ये उपचार सुरु होते.

खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत घरीच उपचार सुरु होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांची प्रकृती अधिक बिघडल्याने अधिक उपचारासाठी नागरपूरला हलवण्यात आलंय.

खासदार नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा यांचा कोरोनाचा अहवाल 6 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर कुटुंबातील एकूण 12 जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं. यामध्ये नवनीत कौर यांच्या मुलांसह सासू सासऱ्यांचा देखील समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्टही केली होती.

आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, सर्जरीनंतर तब्येतीत सुधारणा नाही

आनंदाची बातमी- राज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

बाळासाहेब थोरात खोटं बोलतायेत, केंद्राने दूध भुकटी आयात केली नाही- सदाभाऊ खोत

काँग्रेसने कोरोनाग्रस्त केंद्रीय मंत्र्याला पापड पाठवले, कारण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या