देश

नवनीत राणांचं रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

नवी दिल्ली | रावसाहेब दानवे यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही. शेतकऱ्यांविषयी असं वक्तव्य करू नये, दिल्लीच्या सीमेवर बसलेले शेतकरी हे भारतीय आहे, पाकिस्तानी आणि चीनचे शेतकरी नाहीत, असं म्हणत खासदार नवनीत राणांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडलंय.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात नवनीत राणा सहभागी झाल्या आहेत. यावेळी नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं.

दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील अनेक नेत्यांनी निषेध केलाय.

थोडक्यात बातम्या-

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…

आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर

‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या