बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बँक फोडून टाकेन’; नवनीत राणांना संताप अनावर

अमरावती | अलाहाबाद बँकेच्या कारभारामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना राग अनावर झाल्याचं पहायला मिळालं. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासंतास रांगेत उभे ठेवतात. यासर्व प्रकारावर नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे.

चुर्णी गावच्या दौऱ्यावर असताना अलाहाबाद बँकेच्या शाखेबाहेर लागलेली लोकांची रांग पाहून नवनीत राणा थांबल्या. त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी योग्य उत्तर न दिल्याने नवनीत राण यांनी रागाच्या भरात बँक फोडण्याचा इशारा दिला.

खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करतात. बँकेतून एक हजार रूपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात, अशी माहिती ग्राहकांनी राणा यांना दिली.

दरम्यान, पाच वाजे पर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बँक फोडून टाकेन, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

पडद्यावरच्या खलनायकानं जिंकली जनतेची मनं

“अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More