नागपूर महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

अमरावती | सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.

दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित कुटुंबांसाठी तेलंगणा सरकारने केली मोठी घोषणा!

‘निवडणूक हरलो, तर मला…’; डोनाल्ड ट्रम्प यांची मतदारांना भावनिक साद

अशी थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- देवेंद्र फडणवीस

“माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या