अमरावती महाराष्ट्र

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा

अमरावती | शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊन त्यांना विनंती करु. त्यांनी स्वीकारलं तर ठीक, नाहीतर मातोश्रीसमोर आंदोलन करु, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिला.

हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मी अनेकदा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आता रविवारी आम्ही अमरावतीहून मुंबईला जाऊ, असं नवनीत राणा म्हणाल्या.

आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊ. जर त्यांनी स्वीकारलं तर ठीक, नाहीतर शेतकऱ्यांना घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करु, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी रवी राणा यांच्यासह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रवी राणांच्या पत्नी खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”

पुणे पदवीधरमध्ये “संग्राम”ने वाढवल्या भाजपसमोरच्या अडचणी!

“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?”

“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”

लोकशाहीत सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या