नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोक कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कोरोनाच्या भीतीने सर्वजण काळजी घेत आहेत. तसेच भारतात देखील 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे खासदार नवनीत राणा संसदेत मास्क घालून वावरताना दिसून आल्या.
कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे, असा संदेश राजकीय नेत्यांकडून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कोरोनामुळे यंदा होळीच्या मिलन समारंभात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, घाबरण्याची गरज नाही. आपल्याला मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्वपूर्ण पाऊल उचला, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
दाभोळकर हत्याप्रकरणातील महत्वाचा पुरावा सीबीआयच्या हाती!
अयोध्येला जाता त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडेही जा- बच्चू कडू
महत्वाच्या बातम्या-
“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”
देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा मोठा झटका!
फ्लिपकार्टच्या सचिनविरोधात पत्नी आणि मेव्हणीचे अत्यंत धक्कादायक आरोप
Comments are closed.