देश

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

नवी दिल्ली | रात्री 12 वाजता न्यायालयाने निर्भया प्रकरणात जो निर्णय घेतला त्याबद्दल एक भारतीय महिला म्हणून मी आभार मानते, असं खासदार नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे.

गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढले, संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता. अखेर न्याय मिळाला, माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने 3 महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही अपेक्षा आहे. चारही आरोपींना एकत्र फाशी दिली ही पहिलीच घटना आहे, असं राणा यांनी म्हटलं.

दरम्यान, यापुढेही महिलांना असाच न्याय मिळेल अशी खात्री आहे असं मत खासदार नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“असा गुन्हा करण्याचा विचारही कोण करणार नाही अशी भिती तयार करायची असेल तर…”

तुम्ही पापं केली म्हणून कोरोना आला- राखी सावंत

महत्वाच्या बातम्या-

कोरोनापासून सावध राहा सांगत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग

राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा, फडणवीस समर्थक भाजप नेत्याला रोहित पवारांचे खडेबोल

कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा सरकारनेच सुचवावी- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या