बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशात याप्रकरणावरून आता आमदार रवी राणा यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप केलाय.

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही मनसुख हिरेनप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.

आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

दरम्यान, सचिन वाझेंचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाने परमबीर सिंग यांचीही बदली करावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता सरकारने मुंबई पोलिस दलामध्ये मोठे बदल केले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

“मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात”

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More