नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया नवनीत कौर राणा यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय.
दरम्यान, मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचं सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
थोडक्यात बातम्या-
कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!
कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती
“कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा”
“रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”
शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे