बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

अमरावती | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. या टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. यावर मी ज्यांना ओळखत नाही त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही, असं म्हणत नवनीत राणांनी चाकणकरांना टोला हाणला आहे.

मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अधिनेशनावेळी, आमदार रवी राणा यांनी दिलेलं निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्या वेळी आपण सहभाग घ्यावा, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं. पण हा प्रस्ताव देतानाच त्यांची आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची बाचाबाची झाली. त्यावेळी रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का?’, कियारा झाली ट्रोल

“…तर मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा DNA एकच”

‘रेमडेसिवीरनंतर आता महाराष्ट्रात ‘बर्नोल’ची मागणी वाढतीये खासकरून…’; नितेश राणेंची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More