बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दरवर्षी मुंबई तुंबते…तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल”

मुंबई | राज्याची राजधानी मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग चालू आहे. दरड कोसळल्याच्या अनेक घडताना दिसत आहेत. गेल्या 24 तासात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला. यावरून भाजप नेते टीका करत आहेत. अशातच बीएमसीच्या कारभारावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही निशाणा साधला आहे.

मुंबई तुंबली, मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात, ठाकरेंची तिसरी पीढी असफल, मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा, माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास होत असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बीएमसीचे लोकं कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. बीएमसीच्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने संसदीय समिती नेमण्याची गरज आहे. बीएमसीकडून किती रुपये खर्च केला जातो हे जनतेसमोर येईल. त्यामुळे मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करत असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झालं आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आज नव्या बाधितांची संख्या आली 400 वर

“भाजपचा ‘हा’ नेता बोलायला उभा राहिला तर मुख्यमंत्र्यांना बोलताना विचार करावा लागतो”

दिलासादायक! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

‘प्रसुती वेदना सुरू झाल्यात, बाळाला बघायला नक्की या’; प्राजक्ताची भन्नाट पोस्ट

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More