Top News देश

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

Photo Credit- Facebook / Uddhav thackeray & Navneet Rana

नवी दिल्ली | सध्या कोरोनाच्या रूग्णांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार की नाही याबाबत सर्व जनतेला प्रश्न पडला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना माझं कुटंब माझी जबाबदारीच्या यशस्वी मोहिमेनंतर ‘माझी जबाबदारी’ या नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लॉकडाऊनला फक्त प्रशासन जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत, नियम पाळत नाहीत त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त ‘माझी जबाबदारी’ म्हणून सरकारला हात वर करता येणार नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्यांकडे बोट आणि नियम दाखवताना आधी राज्यातील मंत्र्यांनीही जबाबदारी समजून घ्यायला हवी. आम्ही शिवजयंती साजरी केली तर आमच्यावर गुन्हे आणि सरकारमधील नेत्यांचे जाहीरपणे कार्यक्रम चालू आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर सरकारने सवलत द्यायला हवी, अशी मागणी राज्य सरकारकडे राणा यांनी केली आहे. त्यासोबतच राणा यांना काही दिवसांपुर्वी शिवेसेनेच्या लेटरहेडवरून अॅसिड हल्ल्याची धमकी आली होती. यावर बोसताना राणा म्हणाल्या की, . पोकळ धमक्यांना घाबरणारी मी नाही.

थोडक्यात बातम्या- 

तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

धक्कादायक! मुंबईतील हाॅटेलमध्ये खासदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला….

अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

“मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करुन त्यांच्या मित्रांना मोफत देण्याचं काम करत आहे “

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या