बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा”

नवी दिल्ली | राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर राऊतांनी ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है’,असं ट्विट करत खळबळ उडवून दिली.

राऊतांच्या या ट्विटवरून भाजप (BJP) नेत्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. तर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील राऊतांना टोला लगावला होता. नवनीत राणा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) देखील जोरदार निशाणा साधला. तर राणा यांनी नगरविकास मंत्र्यांबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. मुख्यमंत्र्यांना जर घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं, असं मोठं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.

दरम्यान, खासदारांना जर विचारलं तर त्यांनाही ही आघाडी नको आहे. त्यांना युतीच हवी आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तर संजय राऊत यांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचंच भलं होईल, असा टोला देखील नवनीत राणा यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

आधार, पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

“संजय राऊतांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”

झेलेन्सकी यांचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले…

दमदार फिचर्ससह Kiger कॉम्पॅक्ट SUV भारतात लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More