नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

मुंबई | आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर नवनीत राणा अमरावतीतून शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना आव्हान देतील.

अमरावतीच्या विकासासाठी पवारांनी साथ दिली. त्यासाठी त्यांचे आभार शरद पवार येऊन प्रचार करणार आहेत. अशा भावना नवनीत राणांचे पती आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, नवनीत राणा यांना पवार आणि काँग्रेसने आशीर्वाद दिला. ही मोठी ताकद आहे, असंही रवी राणा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!

-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले

-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे

-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम