Navneet Rana | असदुद्दीन ओवैसी हे हैदराबादचे खासदार झाले आहेत. त्यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांनी संसदेमध्ये शपथ देखील घेतली. अनेकांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी भाषेतून शपथ घेतली. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. अशातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सलग पाचव्यांदा खासदार झालेत. त्यांनी शपथ घेत असताना पॅलेस्टाईनचं नाव घेतल्याने ओवैसींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
नवनीत राणांकडून ओवैसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी
त्यांनी केलेलं कृत्य हे असंविधानिक असल्याचा आरोप आता नवनीत राणा यांनी केला. यामुळे आता भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ओवैसींची खासदारकी काढावी यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी भारतीय संविधानाचं उल्लंघन केल्याचं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ओवैसींच्या शपथविधीवरून खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांना नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पत्र लिहिलं. त्यामध्ये असदुद्दीन ओवैसींनी शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईन असं लिहिलं. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाबा असल्याचं नवनीत राणांनी (Navneet Rana) पत्रात नमूद केलं. तसेच ही देशाच्या दृष्टीने घातक बाब असल्याचं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
शपथ घेताना ओवैसींनी केली जय पॅलेस्टाईनची घोषणा
प्रोटेम स्पीकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांना शपथ घेण्यासाठी बोलवलं. बिसमिल्लाचं पठण करून त्यांनी लोकसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांनी जय पॅलेस्टाईन, जय भीम, जय तेलंगणाची घोषणा केली. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला. तर सोशल मीडियातून असदुद्दीन यांच्यावर टीका केली जात आहे.
हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी विरूद्ध भाजपच्या माधवी लता यांच्यात लढत झाली. तसेच माधवी लता विरूद्ध असदुद्दीन यांच्या लढतीत माधवी लता यांचा पराभव झाला. हा पराभव 3,38,087 मतांनी झाला असल्याची माहिती समोर आली असून असदुद्दीन ओवैसी यांना 6,61,981 मते मिळाली.
News Title – Navneet Rana Write Letter Against Asaduddin Owaisi About Jay Palestine Slogan At Sansad
महत्त्वाच्या बातम्या
“…त्यांना आमच्या बोकांडी आणून ठेवलं, अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा”
“मागून येणाऱ्यांना अगोदर संधी मिळते हे वाईट”; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
पुण्याहून कोकणभागात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!
फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?