”जो रामाचा नाही,तो कोणाचाच नाही…” नवनीत राणांचा ठाकरेंना टोला

मुंबई | शिवसेना हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde) गटाला मिळालं आहे. या निर्णयामुळं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. अनेकजण शिवसेनेला टोला लगावत आहेत,तर दुसरीकडं या निर्णयामुळे धक्क्यात असणारी शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि ठाकरेंचे वाद सर्वश्रुत आहेत. याचदरम्यान कोर्टानं दिलेल्या निर्णयाबद्दल आता पुन्हा एकदा राणांनी ठाकरेंना डिवचलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मध्यंतरी झालेल्या हनुमान चालीसा वादाच्या मुद्दावरुन टोला लगावला.

जो रामाचा नाही,हनुमानाचा नाही तो कुणाचाच नाही आणि धनुष्यबाण त्याचा नाही. तोच निकाला आज लागला आहे. महाशिवरात्री निमित्त महादेवानं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूप चांगला प्रसाद दिला आहे. असा टोला लगावला आहे. त्यानंतर राणांनी झालेला निर्णय कसा योग्य आहे हे देखील सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तळागाळातील नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे चिन्हसाठी शिंदे पात्र आहेत. एकदा पक्ष फुटला की 90 टक्के लोक नव्या गटात जातात आणि निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव आणि चिन्ह नव्या गटाला द्याव लागतं असंदेखील पुढे राणा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .