बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?

मुंबई | लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल तर मी 14 दिवस काय 14 वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे, असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं.

‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर अटकेत असलेल्या राणा दांपत्याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, नवनीत राणा यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत भर पडण्याची दाट शक्यता आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया देत नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर याविरोधात ते आज न्यायालयात जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राणा दांपत्याला प्रसार माध्यमाशी संवाद साधता येणार नसून त्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, नवनीत राणा यांनी रूग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्याना धारेवर धरत तुमच्यात दम असेल तर लोकांमध्ये येऊन निवडून दाखवावं, असं थेट आव्हान दिलं. नवनीत राणांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

“…तर मी 14 दिवसच काय, 14 वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार”

“मी उद्धव ठाकरेंन आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर…”

कृष्णप्रकाश यांच्या अडचणीत वाढ?; दुसऱ्या लेटरबॉम्बने पोलीस दलात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More