बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. यावर खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून मी ही लढाई लढत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू, तिथे न्याय मिळेल हा विश्वास आहे. आनंदराव अडसूळ हे अति उत्साहित होऊन निकालानंतर प्रतिक्रिया देत सुटले आहेत त्यांनी थोडा संयम बाळगावा ते ज्येष्ठ नेते आहेत. हायकोर्टाने जी मुदत दिली आहे त्या मुदतीत पुढचं कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.

आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, तिथे न्याय मिळेल. 2024 पर्यंत आणि त्यानंतरही अमरावतीची खासदार मीच राहणार असल्याचं नवनीत राणांनी म्हटलं आहे. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाचे अखत्यारित असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता आणि अधिकार आहेत. अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली आणि या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिला असल्याचं नवनीत राणांनी सांगितलं.

दरम्यान,  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जात प्रमाण रद्द केल्यावर अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

आनंदाची बातमी! ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झालं सोनं; वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More