बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) हे ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. राणा दांपत्य मुंबईत दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राणा दांपत्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

पोलिसांनी रवी राणा व नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर वांद्रे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांचेही कोरोना (Corona) चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात नेण्यात आल्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर आली आहे.

नवनीत राणा यांची भायखळा तुरूंगात तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. तब्येत खालावल्यानंतर नवनीत राणा यांना भायखळा कारागृहाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात तर रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात नेण्यात आलं आहे. रवी राणा यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. तर नवनीत राणा यांच्या प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलवण्याची देखील शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

IPL 2022: कृणाल पांड्याची विकेट अन् पोलार्डचं हटके सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ

“…हा तर महाराष्ट्राचा अपमान”; जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबियांवर बरसले

“राष्ट्रवादीचा जन्मच शिवसेनेला संपवण्यासाठी झालाय”

“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक

“माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं…”, सचिनला लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More