रुग्णालयातील फोटोंवरुन नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, पहिला गुन्हा दाखल
मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. देशद्रोदाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलं होतं. तब्बल 13 दिवसांनंतर तुरुंगातून त्यांची सुटका झाली. मात्र अद्यापही त्यांच्या अडचणी कायम असल्याचं दिसत आहे.
तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर नवनीत राणांचे उपचारादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
परवानगी नसताना एमआरए विभागात जाऊन एमआरमशीनजवळ मोबाइलवर फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले होते. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आणि जोरदार आक्षेपानंतर वांद्रे पोलिसांनी नवनीत राणा यांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाऱ्यावरुन चांगलेच अडचणीत आले होते. अद्यापही त्यांच्यावर आरोपांचा भडीमार सुरुच आहे.
थोडक्यात बातम्या –
“नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत”
असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ भागावर परिणाम, हवामान विभागाचा गंभीर इशारा
धर्मवीर सिनेमाच्या टीमवर ‘समरेणू’च्या दिग्दर्शकांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
सोन्याच्या दरात आज काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा, म्हणाल्या…
Comments are closed.