बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची तोफ कडाडली, म्हणाल्या…

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) टीकेची तोफ डागली आहे.

माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल तर मला त्यासाठी 13-14 दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली. असं असेल तर यासाठी मी 14 दिवस नाही तर 14 वर्षे तुरूंगात राहण्यास तयार आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

तुरूंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल. मात्र, 14 दिवसांत ही महिला दबली जाणार नाही, असा इशारा देखील नवनीत राणा यांनी दिला आहे.

दरम्यान, नवनीत राणांचे पती व आमदार रवी राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. येत्या काळात राम भक्त व हनुमान भक्त उद्धव ठाकरेंना जागा दाखवतील, असा दावा देखील रवी राणांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांचा ‘चवन्नीछाप’ असा उल्लेख करत रवी राणांचा हल्लाबोल

Sanjay Raut| संजय राऊतांची मोठी घोषणा, म्हणाले…

“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”

“सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा”

काळजी घ्या! संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More